वृत्तसंस्था, नवी दिल्ली
येत्या 24 ऑक्टोंबरला भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं उत्तर प्रदेशच्या आगरा-लखनऊ एक्सप्रेस वे वरुन लँडिंग आणि उड्डाण करणार आहेत.
गेल्या वर्षीही एक्सप्रेस वे वर अशा प्रकारच्या लँडिंगचा सराव केला होता. यावर्षी हवाई दलाची एकूण 20 विमानं एक्सप्रेस वे वरुन लँडिंग आणि उड्डाण करणार आहेत. या सरावासाठी आगरा-लखनऊ एक्सप्रेस वे च्या काही भागामध्ये 20 ते 24 ऑक्टोंबर दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. आगरा-लखनऊ एक्सप्रेस वे वर उन्नाव जिल्ह्याजवळ एअर स्ट्रिप आहे.
मिराज , जॅगवार, सुखोई ही विमाने एक्सप्रेस व लँडिंग आणि उड्डाण करणार आहेत. विमानाचे आकारमान लक्षात घेता लँडिंग आणि उड्डाणासाठी मोकळया जागेची धावपट्टीची गरज असते त्याच पद्धतीने हा रस्त्याची निर्मीती करण्यात आलीय.