जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गेल्या काही दिवसांपासून एअरसेल सिमकार्ड बंद होणार असल्याच्या अफवांना उधान आलं होत. मात्र, खुद्द एअरसेलकडून या अफवांवर फूलस्टॉप लागला आहे. सध्या महाराष्ट्रात तरी एअरसेल बंद होणार नासल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. एअरसेल बंद होणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत, त्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं स्पष्टीकरण एअरसेलने ग्राहकांना मेसेजद्वारे दिलं आहे.
महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश,हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश (पश्चिम) या राज्यातील परवाने एअरसेलने परत केल्याचं म्हटलं आहे. मात्र, एअरसेल कस्टमर केअरशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित ग्राहकांच्या नंबरवर मेसेज करुन, एअरसेल बंद होणार नाही, असे सांगितले आहे. एअरसेल बंद होणार असण्याच्या भीतीने ग्राहक पोर्टसाठी मेसेज करतात, त्यावेळी त्यांना असे मेसेज येत आहेत.