Air Ticket Hike : विमान तिकिटांचे दर गगनाला भिडले! 3500 रुपयांच्या तिकिटात वाढ; प्रवाशांचे बजेट कोलमडले

विमान तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. सलग सुट्या, देवदर्शन आणि लग्न मुहूर्तामुळे सोलापूर विमानसेवेला प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Air Ticket Hike : विमान तिकिटांचे दर गगनाला भिडले! 3500 रुपयांच्या तिकिटात वाढ; प्रवाशांचे बजेट कोलमडले

सलग सुट्ट्या, देवदर्शनासाठी वाढलेली गर्दी आणि लग्नसराईचे मुहूर्त यामुळे सोलापूर विमानसेवेला सध्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत आहे. विशेषतः सोलापूर ते मुंबई या मार्गावरील विमानसेवेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने विमान तिकिटांचे दरही गगनाला भिडले आहेत. अनेक प्रवासी वेळ वाचवण्यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य देत असल्याने विमानतळावरही प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. या वाढत्या मागणीमुळे तिकिटांचे दर सामान्य दिवसांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा- Free Gas Offer: LPG टंचाईवर तोडगा; ग्राहकांना PNG कडे वळवण्यासाठी कंपन्यांकडून खास ऑफर्स
यावेळी सोलापूर ते मुंबई विमान तिकिटाचा दर प्रथमच तब्बल 43 हजारांपर्यंत पोहचला आहे. सामान्य भाडे 3,500 पण मागणी वाढल्याने दरात 12 ते 18 पट वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सोलापूर ते गोवा विमान तिकिटही 18 हजारांपर्यंत पोहचले आहेत. विमानाचे महागडे तिकीट असूनही विमानातील सर्व 60 सीट फुल्ल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारच्या फ्लाइटमध्ये शेवटचे एक तिकीट 43 हजारांवर असून सलग सुट्या, पर्यटन आणि देवदर्शनानिमित्त प्रवाशांच्या गर्दीमुळे तिकिटांचे दर वाढले आहेत. दरम्यान 19 ते 22 मार्च दरम्यानच्या सर्व फ्लाइट्स आधीच हाऊसफुल झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number