धमकी प्रकरणावर आव्हाडांची प्रतिक्रिया

या प्रकरणी जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला सकाळी माझ्या एका मित्राने ही ऑडिओ क्लिप आणून दिली. त्यामध्ये काही धक्कादायक बाबी आहेत. माझ्या मुलीपर्यंत किंवा जावयापर्यंत? पण माझ्या कुटुंबियांवर गोळ्या झाडणारा माणूस अजून या जगात पैदा व्हायचा आहे. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे ४० लाख दिवसाला जमा करतो, २० लाख वाटतो, आणि सारखं त्याने बाबाजी आणि शूटर्सचं नाव […]

धमकी प्रकरणावर आव्हाडांची प्रतिक्रिया

या प्रकरणी जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला सकाळी माझ्या एका मित्राने ही ऑडिओ क्लिप आणून दिली. त्यामध्ये काही धक्कादायक बाबी आहेत. माझ्या मुलीपर्यंत किंवा जावयापर्यंत? पण माझ्या कुटुंबियांवर गोळ्या झाडणारा माणूस अजून या जगात पैदा व्हायचा आहे. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे ४० लाख दिवसाला जमा करतो, २० लाख वाटतो, आणि सारखं त्याने बाबाजी आणि शूटर्सचं नाव घेतलं असल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केलंय.

विशेष म्हणजे स्पेनमध्ये मारेकरी तयार ठेवल्याचे रिकॉर्डींगमध्ये उल्लेख असून माझ्या अंदाजाने जी माहिती मुंबईची आहे, मुंबईचा गँगवार जवळून बघितलेला मी माणूस आहे. हा बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकूर आहे. जो जे जे हत्याकांडातला एक आरोपी होता, असंही आव्हाडांनी सांगितलंय.

“बाबाजीच्या नावावर खूप गुन्हे आहेत. तसा तो कुप्रसिद्ध आहे. त्याच्या जीवावर हे सगळं शूटर्सचं प्लॅनिंग करतोय, हे तो बोलून दाखवतोय. नंतर म्हणतोय मी बाबाजींचं काम करणार आहे. हे सगळं जे काही चालू आहे त्याला लगाम घातला गेला नाही तर गैरकृत्यातून जमवलेली पैशांची थैली त्याने डोकं जड व्हायला लागतं. स्पेनमध्ये शूटर तयार ठेवलेत हे काय बोलणं झालं काय?”, असा सवाल त्यांनी केला.
“एवढी हिंमत सगळं खोटी सर्टिफिकेट्स देऊन मॅनेज करुन अधिकारी झालेला व्यक्ती करतो कसा? त्याने संपूर्ण म्हाडामध्ये पाहिजे तशी 100 घरे दिली आहेत. आजपर्यंत आम्ही बोलत नव्हतो. पण आता अती व्हायला लागलं आहे. मला कालच्या ट्विटमुळेच हे संभाषण मिळालं आहे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number