आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीचा विनयभंग; पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला चपराक

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर   पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला चपराक बसवणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.   श्रीगोंदामधील  दिवटे वस्तीत आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीचा विनयभंग करुन शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली.    एवढच नाही तर, गेल्या चार दिवसांपासून या मुलीच्या कुंटूंबीयांचा रस्ताही अडवण्यात आला. या मुलीच्या नातलगांनी आणि वस्तीवरील नागरिकांनी रस्त्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली, […]

आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीचा विनयभंग; पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला चपराक

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला चपराक बसवणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.

 

श्रीगोंदामधील  दिवटे वस्तीत आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीचा विनयभंग करुन शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली. 

 

एवढच नाही तर, गेल्या चार दिवसांपासून या मुलीच्या कुंटूंबीयांचा रस्ताही अडवण्यात आला. या मुलीच्या नातलगांनी आणि वस्तीवरील नागरिकांनी रस्त्यामध्ये ट्रॅक्टर

ट्रॉली, नांगर, बैलजोडी, मोठमोठे दगड ठेवून रस्ता अडवल्याने आसपासच्या वस्तीवरील जनजीवन विस्कळीत झाले.

 

या विरोधात तक्रार देउनही पोलीस प्रशान दुर्लक्ष करत असून, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number