जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
अहमदनगर येथील भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अवमान केल्याची संतापजनक घटना समोर आली.
तसेच बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यास अपशब्द वापरल्याची ऑडियो क्लिप देखील सोशल मिडियावर व्हायरल झालेय.
कर्मचाऱ्यांनी युनियनकडे तक्रार करत आंदोलनाचा इशारा दिला. या प्रकरणाचे पडसाद नगरमध्ये आता उमटताना दिसतायत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या निवास्थानाची आणि कार्यालयाची काही संघटनाकडून तोडफोड करत संताप व्यक्त केलाय.