जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
अहमदनगरमध्ये चक्क रोड हरवल्याची घटना घडलीय तोही तब्बल 12 लाखांचा. या शहरा जवळच असणाऱ्या नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये श्रीराम कॉलनीत १२ लाखांचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता झाला आणि त्याचे बिल देखील ठेकेदाराला देण्यात आलं.
डिसेंबर २०१६ ला या कामाचे टेंडर निघाले होते तर 2017 मध्ये काम पूर्ण करुन बिल देण्यात आलं. मात्र, प्रत्यक्ष या कॉलनीत कित्येक वर्षात रोडाच झाला नसल्याचे तेथील स्थानिक नागरिक सांगतायत.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे यांनी जेव्हा श्रीराम कॉलनीत रस्त्याचा प्रस्ताव ग्रामपंचायत कार्यलयात दिला त्यावेळी ही बाब समोर आली.
या प्रकरणात ग्रामसेवक आणि तत्कालीन सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.