Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अडचणी, कृषिमंत्र्यांनी राष्ट्रीयकृत बँकांना सुनावले खडेबोल; कर्जमुक्तीबाबत काय म्हणाले दत्तात्रय भरणे?

पुणे : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या नावांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या नावाची यादी महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत. या पात्र शेतकऱ्यांची नावे ऑगस्ट महिन्यात जाहीर होतील. पहिल्या यादीत 553 तर दुसर्‍या यादीत 16 लाख 96 हजार शेतकरी आहेत. पण राष्ट्रीयकृत बँकाच्या धोरणाविषयी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात […]

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अडचणी, कृषिमंत्र्यांनी राष्ट्रीयकृत बँकांना सुनावले खडेबोल; कर्जमुक्तीबाबत काय म्हणाले दत्तात्रय भरणे?

पुणे : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या नावांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या नावाची यादी महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत. या पात्र शेतकऱ्यांची नावे ऑगस्ट महिन्यात जाहीर होतील. पहिल्या यादीत 553 तर दुसर्‍या यादीत 16 लाख 96 हजार शेतकरी आहेत. पण राष्ट्रीयकृत बँकाच्या धोरणाविषयी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल केल्या आहेत. थकीत कर्ज आणि व्याज रक्कमेवरून या सरकारी बँका शेतकऱ्यांना अडवत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बँकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आज, बुधावरी पत्रकार परिषद घेत यांनी कृषिमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली. 

हेही वाचा : Pune University Fake Marksheet Scam : विद्यार्थ्यांच्या भवितव्यांशी खेळ! शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठात बोगस मार्कशीट आणि डिग्री विक्रीचा घोटाळा

यावेळी बोलताना भरणे म्हणाले की, कर्जमाफी योजना सरकारने जाहीर केली होती. साधारणत: 16 लाख 96 हजार खात्यांना कर्जमाफीसंदर्भातील दुसरी यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यांना आपण विशिष्ट क्रमांकही दिलेला आहे. परंतू काही बाबतीत अडचणी येत आहे. जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत अडचण वाटत नाही. पण राष्ट्रीयकृत बँकांविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. शेतकरी जेव्हा ई-केवायसी करायला जातो. त्यावेळी त्याच्यावर असलेले कर्ज, थकीत रक्कम आणि व्याज यामध्ये तफावत दिसते. त्यावरून शेतकऱ्यांनी तक्रारी केल्याचा आरोप भरणे यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number