Dattatray Bharne: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली…, कृषीमंत्री भरणेंचे आदेश

राज्यावर ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

Dattatray Bharne: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली…, कृषीमंत्री भरणेंचे आदेश

जालना: राज्यावर ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज जालनातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण मदत दिली जाईल असे कृषीमंत्री भरणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. 

राज्यात सर्वाधिक पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झाला असून, यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याचे भरणे यांनी म्हटले. तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठराविक निकष तपासणे आवश्यक असते. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्र सरकारसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दत्तात्रय भरणे म्हणाले की, "ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे किंवा ज्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांना शासन तातडीची मदत करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो पाठविण्याची गरज नाही. कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी थेट शेतात जाऊन पंचनामे करतील."

हेही वाचा: Weather Update: कोकणात पाऊस सुरूच, मुंबईसह ठाण्याला पुन्हा अलर्ट, हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट समोर

'शेतकऱ्यांवर कर्जवसुली होणार नाही'
ज्या भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तिथे शेतकऱ्यांवर कर्जवसुली होणार नाही. राज्य सरकार याबाबत बँकांना स्पष्ट सूचना देणार असल्याचे भरणे यांनी सांगितले. पुढे बोलताना, शासनाने नुकतेच 2 हजार 215 कोटी रुपये मदत निधी जमा केले असून, ही रक्कम हळूहळू वाढत आहे. या निधीतून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत वितरित केली जाईल. तसेच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कोणतीही मदत थांबणार नाही. शासन प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवेल असे भरणे यांनी सांगितले.

निसर्गाच्या या संकटात शेतकऱ्यांना शासन एकटे सोडणार नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसोबतच आवश्यक ते सर्व दिले जाईल. शेतकऱ्यांसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे असे कृषीमंत्री म्हणाले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number