जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलयं. जगातील लोकप्रिय सर्च इंजिन गूगलनं थेट शिवाजी विद्यापीठाशी एक करार केलाय आणि त्याचा मोठा फायदा विद्यापीठाच्या सगळ्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
दैनंदिन व्यवहारांमध्ये मोबाईल app चा वापर वाढलाय आणि याच app सह android प्रणालीबाबतचे नवीन संशोधन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात एक प्रयोगशाळा उभारणार आहे. खास बात म्बणजे ही प्रयोगशाळा गूगलकडून उभी होणार आहे.या महिन्यामध्ये शिवाजी विद्यापीठ आणि गुगल यांच्यात करार होणार असून त्याचा मोठा फायदा शिवाजी विद्यापीठाच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना एक अनोखी भेट मिळाली आहे.
शिवाजी विद्यापीठातील अनेक कोर्सेससाठी ही प्रयोगशाळा उपयोगात आणली जाणार आहे. त्यासाठी प्राध्यापकांनाही विशेष ट्रेनिंग देण्यात आल आहे. त्यासाठी आता संपूर्ण विद्यापीठाची यंत्रणाही सज्ज झाली आहे.