Pune : पुण्यात अग्नितांडव; एकाचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यात एक धक्कादायक घटना घडलीय. पुण्याच्या बी.टी. कवडे रोड येथे भंगाराच्या दुकानांमध्ये जुन्या फ्रिजचे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकाच खळबळ उडालीय.

Pune : पुण्यात अग्नितांडव; एकाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे: पुण्यात एक धक्कादायक घटना घडलीय.  पुण्याच्या बी.टी. कवडे रोड येथे भंगाराच्या दुकानांमध्ये जुन्या फ्रिजचे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकाच खळबळ उडालीय. धक्कादायक म्हणजे या स्फोटात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर तिघे गंभीर जखमी आहेत. 

नेमकं काय घडलं? 

बी टी कवडे रोडवर पेट्रोलपंपा जवळ एक भंगाराचं दुकान आहे. या दुकानात शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की अर्धा किलोमीटर पर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आला. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण दिसून येतंय.  या घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत .या घटनेतील जखमींना उपचारार्थी रुग्णालयात रवाना करण्यात आलाय. 

बी. टी. कवडे रस्त्यावर नवशा गणपती पुढे भंगार मालाचा साठा असणाऱ्या पञ्याचे शेडमध्ये फ्रिजमधील कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याचे उघड झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण दिसून येत आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number