इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करा – देवेंद्र फडणवीस

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाची प्रदेश कार्यसमितीची बैठक पार पडली. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडली असून या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवर आदी उपस्थित होते. यावेळी बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मविआवर टीका केली आहे. राज्यातील इंधनावरील दरवाढ मविआ सरकारमुळे आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी […]

इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करा – देवेंद्र फडणवीस

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाची प्रदेश कार्यसमितीची बैठक पार पडली. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडली असून या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवर आदी उपस्थित होते. यावेळी बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मविआवर टीका केली आहे.

राज्यातील इंधनावरील दरवाढ मविआ सरकारमुळे आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात इंधनावरील केंद्र सरकारचा कर १९ रुपये प्रतिलीटर आहे तर राज्याच्याकर २९ रुपये प्रतिलीटर आहे. त्यामुळे राज्यात कोणामुळे महागाई आहे हा सवाल उपस्थित करत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगावे. तसेच या विषयावर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मविआचं खोटं उघडं पाडण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षणावरूनही मविआवर निशाणा साधला. मध्यप्रदेशात ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळाले आहे. त्याचप्रमाणे आम्ही महाराष्ट्रातही हा उपाय करण्याचा सल्ला मविआला दिला आहे. परंतु मविआने त्यानुसार काहीही केले नाही आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळूच नये असे कोणाचे तरी षडयंत्र दिसत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number