Mumbai BMC News : कोर्टाने फटकारले, पालिकेने तातडीने घेतली आढावा बैठक; मुंबईत कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

मुंबई : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अनुषंगाने, महानगरपालिका मुख्यालयात आज, शनिवारी विविध विभागांची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मुंबईत स्वच्छता वाढवणे, उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध घालणे आणि कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points-GVP’s) कायमस्वरुपी निर्मूलन […]

Mumbai BMC News : कोर्टाने फटकारले, पालिकेने तातडीने घेतली आढावा बैठक; मुंबईत कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

मुंबई : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अनुषंगाने, महानगरपालिका मुख्यालयात आज, शनिवारी विविध विभागांची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मुंबईत स्वच्छता वाढवणे, उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध घालणे आणि कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points-GVP’s) कायमस्वरुपी निर्मूलन करण्यासाठी व्यापक उपाययोजना करणे, या विषयांवर भर देण्यात आला. 

या अंतर्गत बाजारपेठा, मुख्य रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे आणि भूखंड, समुद्रकिनारे, नाले व इतर जलस्रोतांच्या परिसरांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तर, कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणी (Garbage Vulnerable Points-GVP’s) सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे निगराणी केली जात आहे. तसेच, कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी यावेळी सांगितले.  

हेही वाचा : MNS Internal Conflict: राज ठाकरेंच्या मनसेला मोठं भगदाड; संपर्क अध्यक्षांसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम

शाळा, रुग्णालये, रेल्वे, मेट्रो स्थानक, बस स्थानक तसेच बाजारपेठ आदी परिसरातील पदपथांवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण तत्काळ हटवून पदपथ सुलभ करावेत. अनधिकृत बांधकामांचे निष्कासन करावे तसेच अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितित अधिकृत करु नयेत. प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडीस (बॉटलनेक) कारणीभूत बाबींवर उपाययोजना कराव्यात. तसेच, महानगरपालिकेच्या ‘मार्ग’ अ‍ॅपवर प्राप्त तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करावेत, असे निर्देश देखील आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते. तसेच, सह आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख आदी उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number