Maharashtra Weather Alert: उन्हाच्या चटक्यानंतर आता गारांचा मारा! नागपूर, भंडाऱ्यासह 7 जिल्ह्यांना गारपीट अन् पावसाचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्यातील 7 जिल्ह्यांना 'हाय अलर्ट' देण्यात आला असून, मुसळधार पावसासह गारपिटीचे संकट गडद झाले आहे.

Maharashtra Weather Alert: उन्हाच्या चटक्यानंतर आता गारांचा मारा! नागपूर, भंडाऱ्यासह 7 जिल्ह्यांना गारपीट अन् पावसाचा इशारा

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सत्र सुरूच असून, पुढील 48 तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्यातील 7 जिल्ह्यांना 'हाय अलर्ट' देण्यात आला असून, मुसळधार पावसासह गारपिटीचे संकट गडद झाले आहे. 21 ते 25 मार्च या कालावधीत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात गारपिटीचे सावट आणि 'द्रोणिका'चा प्रभाव
विदर्भातील वातावरणात 'अप्पर टफ वे' (द्रोणिका रेषा) तयार झाल्यामुळे 22  मार्चपर्यंत या भागात अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार आहे. नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या आठवड्यात विदर्भाचे तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक उकाड्याने हैराण होते, मात्र आता पावसामुळे तापमानात घट होऊन दिलासा मिळाला असला, तरी शेतीसाठी हे वातावरण घातक ठरणार आहे.

7 जिल्ह्यांना विशेष इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली
हवामान खात्याने नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांसह मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा वेग अधिक असेल. गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या गारपिटीमुळे पिकांचे आधीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नवीन इशाऱ्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे.

हेही वाचा – Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट; पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही विजांचा कडकडाट
केवळ विदर्भच नव्हे, तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने नागरिकांना विजा पडण्याच्या घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. काढणीला आलेल्या पिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शेतकऱ्यांची आता लगबग सुरू झाली असून, निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, उष्णतेच्या लाटेनंतर आता अवकाळी पावसाने महाराष्ट्राला विळखा घातला आहे. पुढील दोन दिवस नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडणे हिताचे ठरेल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number