मुंबई-नागपूर या दोन महामार्गांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होण्यापूर्वीच या महामार्गावर वाहने सुसाट चालवताना पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वीच महामार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावर अपघात घडला असून पहिला बळी गेला आहे. त्यामुळे महामार्गाचे काम सुरू असताना या महामार्गावर वाहतुकीस परवानगी कशी देण्यात आली? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
समृद्धी महामार्ग अजुनही वाहतुकीसाठी खुला नसल्याचं एक पत्र देत या महामार्गावरून कोणीही वाहतूक करु नये असे आवाहन महामार्ग प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे . त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या समृद्धी पूर्वीच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला की काय ?असा प्रश्न या महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे पाहून निर्माण होतो.
अजूनही या महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण झालेल नसून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तांत्रिक तपासणी होणे बाकी आहे.. त्यामुळे या संपूर्ण गंभीर बाबीकडे समृद्धी महामार्ग प्रशासन कटाक्षाने लक्ष देईल का ? हा खरा प्रश्न आहे.समृद्धी महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी छोटे मोठे काम बाकी तुकडे जोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या महामार्गवरून वाहतूक करणे धोक्याचे आहे. या महामार्गावर वाहनांची रहदारी कमी असल्यामुळे वाहनचालक वेगाने वाहने चालवत आहेत. समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण न झाल्यामुळे या महामार्गाचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले.