शिंदेंनंतर शिवसेनेत नीलम गोऱ्हे यांना मोठे पद

मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांना धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्यनेता एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे पद नीलम गोऱ्हे यांना देण्यात आले आहे. म्हणजेच पक्षात एकनाथ शिंदे यांच्यानंतरचे सर्वात मोठे पद नीलम गोऱ्हे […]

शिंदेंनंतर शिवसेनेत नीलम गोऱ्हे यांना मोठे पद

मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांना धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्यनेता एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे पद नीलम गोऱ्हे यांना देण्यात आले आहे. म्हणजेच पक्षात एकनाथ शिंदे यांच्यानंतरचे सर्वात मोठे पद नीलम गोऱ्हे यांना देण्यात आले आहे. त्यामुळे पक्षातील त्यांचे वजन वाढले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नीलम गोऱ्हे या उपनेतेपदी होत्या.

नीलम गोऱ्हे यांनी कालच शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर लगेच त्यांची शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती करणारे पत्र एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आले. या पत्रात म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर आंद दिघे यांच्या प्रेरणेने आपली शिवसेना नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हुंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल असा विश्वास आहे.

दरम्यान, शिंदे गटात आपण प्रवेश का केला, याबाबत स्पष्टीकरण देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सद्यस्थितीत सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिकृत आहे. केंद्रीय स्तरावर एनडीएने व भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येत श्रीराम प्रभूचे मंदिर, तलाक पीडित महिलांना न्याय, काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज व राज्यघटनेत उल्लेख केलेल्या समान नागरी कायद्याबाबतची सकारात्मक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची वरील सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे. राष्ट्रीय स्तरावरील या भूमिका घेऊन देशात व राज्यात युतीचे सरकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भूमिकांवर आयुष्य समर्पित केले, त्या भूमिकांचा सन्मान करून काम करत आहे.

नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व या भूमिकेसोबतच महिला विकासाला चालना, महिला व बालके, वंचित घटक, आदिवासी, असंघटित कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नावर धोरणात्मक व प्रत्यक्ष कामाची गरज आहे. हे सर्व काम करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन करते व तसे काम करण्याचा निर्णय घेत आहे. मी उपसभापती पदावर असल्याने त्या वैधानिक पदाच्या चौकटीचा सन्मान करतच हे काम करणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number