वृत्तसंस्था, नवी दिल्ली
स्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यापूर्वी जुलै 2017 मध्ये पंतप्रधान मोदी इस्राईलच्या दौऱ्यावर गेले होते. गतकाळातील भारत दौऱ्यावर येणारे ते दुसरे इस्राईली पंतप्रधान ठरलेत. राष्ट्रपती भावनात बेंजामिन नेतन्याहू यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. सोमवारी पंतप्रधान मोदींसोबत होणाऱ्या बैठकीत दोन्ही देशांतील संबंध वृद्धिंगत करण्यावर भर दिला जाणार आहे.

बेंजामिन नेतन्याहू यांच्यासमवेत माहिती तंत्रज्ञान, शेती आणि संरक्षणासह विविध क्षेत्रांतील 130 सदस्यीय प्रतिनिधीमंडळही असणार आहे. भारत आणि इस्राईलच्या या भेटीत भारतातील ऊर्जा, पाणी, ऑटोमेशन प्रॉडक्ट्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील 10 व्यवसाय आणि उद्योग संबंधित समस्यांचे हस्तांतरीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान, या भेटीत पीएम बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह 130 व्यावसायिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.