धर्मांतर, औरंग्याचे स्टेट्स, लव्ह जिहाद या विषयांनी समाजी आणि राजकीयरित्या अनेक वेगवेगळी वळणं घेतली आहेत. यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. तर, शुक्रवारी (दि. ९ जून) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनाही धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे.
खासदार राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनाही फोनवरुन ‘सकाळचा ९ वाजताचा भोंगा बंद करा नाहीतर गोळ्या मारू’ असं म्हणत जीवे मारण्याची धमकी आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांना एकाच दिवसांत जीवे मारण्याच्या धमक्या आल्यामुळे खळबळ माजली आहे.