जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाजपा-शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या पालघर पोटनिवडणुकीत अखेर भाजपाने बाजी मारली. राजेंद्र गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा २९,५७२ मतांनी पराभव केला.श्रीनिवास वनगा भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामणी वनगा यांचा मुलगा आहे.
पालघर पोटनिवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल अशी बातमी पसरली होती. पण सेना काही बाहेर पडली नाही. पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवेसना भवनात पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे यांनी २०१४ मध्ये पुढील २५ वर्ष हे सरकार जाणार नाही असं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. मात्र पोटनिवडणुकांचे निकाल पाहता मोदी सरकारनं बहुमत गमावलं, हे स्पष्ट दिसतंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवरायांचा अपमान केला असतानाही त्यांचा उमेदवार विजयी झाला याचं दुख: असल्याचं उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. चर्चा किंवा युतीसाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा. भाजपाने शिवसेनेशी चर्चा किंवा युती करायला कधीही नकार दिलेला नाही. आम्ही चर्चेसाठी कधीच नकार दिलेला नाहीस,असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, आता जर शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तर आगीमधून फुफाट्यात पडल्यासारखी त्यांची अवस्था होईल, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उध्द्वव ठाकरे यांना टोला लगावला.
चर्चा किंवा युतीसाठी शिवसेनेनेही पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री फडणवीस
पुढील निवडणुका स्वबळावरच लढणार – उद्धव ठाकरे