मिलिंद एकबोटेंनंतर आता संभाजी भिडेंनाही 26 तारखेपर्यंत अटक करा, अन्यथा मुंबईत मोर्चा काढू – प्रकाश आंबेडकर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई कोरेगाव-भीमा हिंसाचार भडकावल्या प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाकडून 19 मार्चपर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यावर आता भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनाही अटक करा, नाहीतर मुंबईत मोर्चा काढू,” असा सांगितले आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी सरकारला 26 मार्चपर्यंतची मुदत देखील दिली आहे. “कोरेगाव-भीमा […]

मिलिंद एकबोटेंनंतर आता संभाजी भिडेंनाही 26 तारखेपर्यंत अटक करा, अन्यथा मुंबईत मोर्चा काढू – प्रकाश आंबेडकर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कोरेगाव-भीमा हिंसाचार भडकावल्या प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाकडून 19 मार्चपर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यावर आता भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनाही अटक करा, नाहीतर मुंबईत मोर्चा काढू,” असा सांगितले आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी सरकारला 26 मार्चपर्यंतची मुदत देखील दिली आहे.

“कोरेगाव-भीमा हिंसाचार भडकावण्यात जेवढी मिलिंद एकबोटे यांची भूमिका आहे तेवढीच संभाजी भिडेही यांचीही भूमिका आहे,असं त्यांनी यावेळी म्हटलं. मिलिंद एकबोटेंना अटक केल्यानंतर आता संभाजी भिडेंनाही 26 तारखेपर्यंत अटक करा, अन्यथा कोरेगाव-भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियान आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे मुंबईत मोर्चा काढू,” असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला .

या दरम्यान त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बंद केलेल्या शिष्यवृत्ती सुरु करा अशी मागणी सरकारकडे केली आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहत्या घरातून एकबोटेंवर अटकेची कारवाई केली.

1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा इथे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर सणसवाडीत दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी चिथावल्याचा आरोप आहे. एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील सत्र न्यायालयाने 22 जानेवारीला फेटाळला. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टानेही दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर मिलिंद एकबोटेंनी सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number