Middle East Conflict: महागाईमुळे पेटवलेली चूलही विझणार! युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसनंतर लाकूडही परवडेनासे; दर ऐकून चिंता वाढेल

अमेरिका इजराइल व इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या गॅसवरून चुलीकडे वळलेल्या व्यवसायिकांसाठी मोठी बातमी, आता लाकडांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.

Middle East Conflict: महागाईमुळे पेटवलेली चूलही विझणार! युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसनंतर लाकूडही परवडेनासे; दर ऐकून चिंता वाढेल

अमेरिका इजराइल व इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा सुरू आहे. दरम्यान कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे हॉटेल व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या हॉटेल व्यवसायिकांना मोठा फटका बसत आहे. अनेक व्यावसायिकांना गॅस अभावी हॉटेल बंद करण्याची वेळ आली असून हॉटेल व्यवसायिकांसह काम करणाऱ्या कामगारांनाही घरी बसण्याची वेळ आली आहे. यावर उपाय म्हणून अनेक हॉटेल व्यवसायिकांनी गॅसच्या शेगडी सोडून चुलीकडे तोंड फिरवले असता आता त्यामध्ये देखील त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे एलपीजी गॅस महागलेले असताना आता लाकडांच्या दरातही वाढ झाली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका गॅस पुरवठ्यावर झाल्यामुळे चुलीवर आलेल्या हॉटेल मालकांमुळे लाकडांची मागणी वाढली आहे. यामुळे आता लाकडांचे दरही वाढू लागले आहे. 4 ते 5 रुपये किलोने मिळणारा लाकूड आता 8 तर 12 रुपये किलोने मिळू लागला आहे. त्यामुळे व्यवसायिकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. 

हेही वाचा- Middle East Conflict: कॅप्टनची जबरदस्त हुशारी! युद्धाच्या आगीतून मार्ग काढत कच्च्या तेलाचा टँकर मुंबईत दाखल, थरारक गोष्ट एकदा वाचाच
इंडक्शन आणि इलेक्ट्रिक उपकरणांच्या मागणीत मोठी वाढ
मध्यपूर्वेतील तणावामुळे गेल्या काही दिवसांत इंडक्शन कुकरची विक्री अचानक वाढली आहे. अनेक ग्राहक गॅस पुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वयंपाकासाठी पर्यायी साधने खरेदी करत आहेत, जेणेकरून घरातील रोजचे जेवण तयार करण्यात कोणतीही अडचण येऊ नये.घरगुती गॅसचा पुरवठा अनिश्चित होईल का, या भीतीमुळे अनेक कुटुंबांनी पर्यायी स्वयंपाक साधनांचा शोध सुरू केला आहे. परिणामी बाजारात इंडक्शन कुकरटॉप आणि इतर इलेक्ट्रिक कुकिंग उपकरणांची मागणी अचानक वाढल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा- Middle East War: भारतीय परराष्ट्र धोरणाचा 'मास्टरस्ट्रोक'; हॉर्मुज सामुद्रधुनीत भारतीय जहाजांना 'ग्रीन सिग्नल'
शेतकऱ्यांचे मोठं नुकसान
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका गॅस पुरवठ्यावर झाला असून याचा थेट परिणाम विविध व्यवसायांवर झालेला पाहायला मिळत आहे. गॅस पुरवठा बंद झाल्याने एमएमआर रिजन मधील अनेक हॉटेल्स बंद पडत असून याचा थेट परिणाम एपीएमसीतील भाजी मार्केट वर झालाय. एपीएमसी भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याला उठावंच नसल्याने भाजीपाला मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहत असून भाजीपाल्याला उठाव नसल्याने भाज्यांचे दर तब्बल 25 ते 30 टक्क्यांनी घसरलेले पाहायला मिळत आहेत. वांगी, फ्लॉवर, कोबी, भेंडी आणि वाटाणाच्या दरात मोठी घट झाली असून यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number