तब्बल चार तासानंतर आंदोलन मागे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मध्य रेल्वे ठप्प केली. संतप्त विद्यार्थ्यांनी दादर – माटुंगा स्थानकादरम्यान रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. तब्बल चार तासानंतर अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आपला रेल रोको मागे घेतला आहे. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आंदोलन मागे घेतलं. पूर्वी रेल्वे अप्रेंटिसना थेट रेल्वेत सामावून घेतलं जायचं, पण […]

तब्बल चार तासानंतर आंदोलन मागे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मध्य रेल्वे ठप्प केली. संतप्त विद्यार्थ्यांनी दादर – माटुंगा स्थानकादरम्यान रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. तब्बल चार तासानंतर अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आपला रेल रोको मागे घेतला आहे.

प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आंदोलन मागे घेतलं. पूर्वी रेल्वे अप्रेंटिसना थेट रेल्वेत सामावून घेतलं जायचं, पण आता त्यासाठी 20 टक्के इतका कोटा ठरवला गेलाय, शिवाय एक लेखी परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे रेल्वेतल्या संधी कमी झाल्याचा युवकांचा आरोप आहे. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. यामध्ये अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे.

20 टक्के कोटा कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा. रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना रेल्वे सेवेत कायमस्वरुपी सामाविष्ट करण्यात यावं. रेल्वे अॅप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेसेवत सामाविष्ट करावं, भविष्यातही नियम लागू ठेवावा.याबाबत एका महिन्यात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करु नये. अशा रेल्वे अॅप्रेंटिसच्या मागण्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number