Afghanistan Pakistan War: अफगाण सैन्याने तोफखाना आणि रणगाड्यांनिशी पाकिस्तानला हादरवले; सीमेवर रक्ताचा सडा

ड्युरंड लाईन परिसरात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी तणाव वाढला आहे.

Afghanistan Pakistan War: अफगाण सैन्याने तोफखाना आणि रणगाड्यांनिशी पाकिस्तानला हादरवले; सीमेवर रक्ताचा सडा

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला असून सीमारेषेवर मोठी लष्करी कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. अफगाण सैन्याने ड्युरंड लाईन ओलांडत खोस्त-खुर्रम सीमेच्या परिसरात पाकिस्तानी लष्करी ठिकाणांवर हल्ला केल्याचे वृत्त आहे. या कारवाईकडे ‘सर्जिकल स्ट्राइक’ म्हणून पाहिले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अफगाण सैन्याने खुर्रम भागातील पाकिस्तानी सैन्याच्या तळांना लक्ष्य करत एका लष्करी वाहनालाही आग लावली. याशिवाय इतर काही ठिकाणांवरही हल्ले करण्यात आले. या अचानक कारवाईमुळे सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अफगाण सैन्याकडून तोफखाना आणि रणगाड्यांचा वापर करत सलग हल्ले करण्यात आले. उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. या कारवाईत पाकिस्तानचे किमान तीन सैनिक ठार झाले असून सुमारे 12 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Sunetra Pawar Meet Praful Patel-Sunil Tatkare: राष्ट्रवादीत धुसफूस? सुनेत्रा पवारांनी घेतली पटेल-तटकरेंची नवी दिल्लीत भेट

या आधीही अफगाणिस्तानने पाकिस्तानवर गंभीर आरोप केले होते. 3 मार्च 2026 रोजी अफगाणिस्तानने आरोप केला होता की, पाकिस्तानच्या सैन्याने कुनार प्रांतातील असदाबाद परिसरात गोळीबार केला होता. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर 16 जण जखमी झाले होते. जखमींमध्ये महिला आणि मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.

दोन्ही देशांतील तणाव मागील काही महिन्यांपासून वाढत आहे. विशेषतः फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानने अफगाण सीमेजवळ हवाई हल्ले केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर अफगाणिस्ताननेही प्रत्युत्तरादाखल सीमापार कारवाई केली होती.

तणाव वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे दहशतवादी संघटनांचा मुद्दा आहे. पाकिस्तानचा आरोप आहे की अफगाणिस्तानातील तालिबान सरकार तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान सारख्या संघटनांना आश्रय देते, जे पाकिस्तानमध्ये घुसखोरी करून हल्ले करतात. मात्र अफगाण तालिबानने हे आरोप फेटाळून लावत, टीटीपी हा पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न असल्याचे स्पष्ट केले आहे.

एकूणच, सीमावर्ती भागातील वाढता संघर्ष आणि परस्पर आरोप-प्रत्यारोप यामुळे दक्षिण आशियातील सुरक्षेच्या दृष्टीने परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. पुढील काही दिवसांत या तणावाची दिशा काय असेल, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा: IPL 2026: 'सिक्सर किंग' अभिषेक शर्माचा KKR विरुद्ध झंझावात! रोहित शर्माच्या विक्रमाशी साधली बरोबरी, रचला षटकारांचा 'त्रिशतकी' इतिहास

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number