Dhule News: धुळ्यात धक्कादायक प्रकार उघड; दूध उकळताच बनला रबरासारखा घट्ट गोळा

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dhule News: धुळ्यात धक्कादायक प्रकार उघड; दूध उकळताच बनला रबरासारखा घट्ट गोळा

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुध उकळल्यानंतर ते रबरा सारखे घट्ट होऊन गोळा बनल्याचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरपूर तालुक्यातील खर्दे गावातील रहिवासी आशाबाई बोरसे यांनी नेहमीप्रमाणे स्थानिक दुधवाल्याकडून दूध खरेदी केले होते. मात्र रात्री दूध गरम करताना त्यांना धक्काच बसला. दूध उकळल्यानंतर ते नेहमीप्रमाणे द्रव स्वरूपात न राहता रबरा सारखे घट्ट होत गोळा बनल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून आशाबाई बोरसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

बोरसे यांनी सांगितले की, त्या अनेक वर्षांपासून त्याच दुधवाल्याकडून दूध घेत आहेत. मात्र यापूर्वी कधीही असा प्रकार घडला नव्हता. त्यामुळे दुधात भेसळ केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून दुधाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.यापूर्वीही शिरपूर शहरात भेसळयुक्त दुधाचा गंभीर प्रकार समोर आला होता. त्या घटनेनंतरही प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली दिसून येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दुर्लक्षामुळे अशा भेसळीच्या घटना वाढत असल्याचीही टीका स्थानिकांकडून होत आहे.

शिरपूर तालुक्यातील खर्दे येथील आशाबाई बोरसे यांच्या घरी दुध उकळल्यानंतर दुधाचा रबरा सारखा पदार्थ बनला होता.या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्यातीने कार्यवाही करण्यात येत आहे.तक्रारदार यांच्याकडे चौकशीनंतर अन्न व औषध पथकाने दुध विक्रेत्याच्या म्हशींचा गोठ्यासह राहत्या घरी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने चौकशी करत तपासणीसाठी दुधाचे नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. दुधाचे नमुने लॅबमध्ये पाठवून यात नेमकं काय निष्पन्न होत या नंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकारींकडून सांगण्यात आले आहे.या कारवाईत शिरपूर शहर पोलिसांनी देखील महत्वाची भुमिका बजावली असून याबाबत शिरपूर पोलीस देखील चौकशीसाठी सज्ज झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number