Tukaram Mundhe Raid Oil Company : छत्रपती संभाजीनगरमध्ये FDAची सर्वात मोठी धाड! कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी या विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून कारवाईला वेग आला असून दूध भेसळ, हॉटेल्स, मेडीकलसह इतरही ठिकाणी विभागाने धाडी टाकत कारवाई केलीय.

Tukaram Mundhe Raid Oil Company : छत्रपती संभाजीनगरमध्ये FDAची सर्वात मोठी धाड! कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी या विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून कारवाईला वेग आला असून दूध भेसळ, हॉटेल्स, मेडीकलसह इतरही ठिकाणी विभागाने धाडी टाकत कारवाई केली आहे. अशातच तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्त्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन नामांकित ऑईल रिपॅकिंग युनिट्सवर धाड टाकत तब्बल 2 कोटी 93 लाख 35 हजार 603 रुपयांचा संशयास्पद व निकृष्ट दर्जाचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. एवढचं नव्हे तर दोन्ही कंपन्यांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.

शनिवारी 11 जुलै 2026 रोजी अन्न व औषध प्रशासनाने गोपनीय माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील गेवराई तांडा गाव येथील मेसर्स बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स आणि मे. बागारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दोन्ही ऑईल रिपॅकिंग युनिट्सच्या आस्थापनांवर एकाच वेळी छापा टाकला. या धडक कारवाई वेळी अधिकाऱ्यांसमोर चक्रावून टाकणारी बाब समोर आली.

हेही वाचा- Gas Cylinder New Rules : LPG वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! गॅस सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय; सिलिंडरचे वितरण होणार अधिक सोपं

खाद्यतेल पॅक करण्यासाठी आधीच वापरलेल्या जुन्या व घाणेरड्या डब्यांचा वापर करत असल्याचे अधिकाऱ्यांनी उघड झाले. इतकचं नव्हे तर बंद असलेला हा अस्वच्छ रिफायनरी विभाग आणि चालू असलेला रिपॅकिंग (पुन्हा पैक करण्याचा) विभाग एकाच आवारात असल्याने तेलामध्ये परस्पर दूषितीकरणाचा अत्यंत मोठा धोका निर्माण झाला होता. यावेळी तेथील अस्वच्छता आणि निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला. 

यावेळी कारखान्यात अत्यंत घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त तेल साठवलेले टब उघड्यावर पडून होते. तसेच यंत्रसामग्री, फरशी, भिंती आणि आजूबाजूचा परिसर कमालीचा अस्वच्छ आणि दुर्लक्षित होता. यंत्रसामग्रीवर प्रचंड धूळ, कोळी-काजळी आणि गंज चढलेला होता. तसेच तपासात वापरलेले टिन पुन्हा वापरले जात असल्याचे, यंत्रसामग्रीवर धूळ, गंज आणि घाण साचल्याचे, दुर्गंधीयुक्त तेलाचे टब, फूड ग्रेड प्रमाणपत्रांचा अभाव, तेलाची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रयोगशाळा नसणे तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती न केल्याचेही समोर आले. यावेळी छत्रपती संभाजीनगरात खाद्यतेलाच्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number