आता गुंतवणुकीसाठीही आधार कार्ड सक्तीचे

  जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई बँकेच्या खात्यासाठी, सर्वप्रकारच्या अनुदानांचा लाभ घेण्यासाठी, जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसाठी केंद्र सरकारने आधार कार्ड बंधनकारक केल्यानंतर आता गुंतवणुकीसाठीही आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. देशातील म्युच्युअल फंडची शिखर संस्था असणाऱ्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स’ने या विषयी सर्व फंड हाऊसना कल्पना दिली आहे. त्यानुसार येत्या 1 जानेवारीपासून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार कार्डचे […]

आता गुंतवणुकीसाठीही आधार कार्ड सक्तीचे

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बँकेच्या खात्यासाठी, सर्वप्रकारच्या अनुदानांचा लाभ घेण्यासाठी, जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसाठी केंद्र सरकारने आधार कार्ड बंधनकारक केल्यानंतर आता गुंतवणुकीसाठीही आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. देशातील म्युच्युअल फंडची शिखर संस्था असणाऱ्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स’ने या विषयी सर्व फंड हाऊसना कल्पना दिली आहे. त्यानुसार येत्या 1 जानेवारीपासून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार कार्डचे तपशील द्यावे लागणार आहेत. ‘अॅम्फी’ने 23 ऑक्टोबरला मत्ता व्यवस्थापन कंपन्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये या विषयीचा खुलासा करण्यात आला आहे. येत्या एक जानेवारीपासून म्युच्युअल फंडात होणारी कोणतीही गुंतवणूक ग्राहकाच्या आधार कार्डाच्या तपशीलाशिवाय न घेण्याचे बजावले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number