कुवेतमध्ये भारताचा अपमान, अदनान सामीने ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केला संताप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अदनान सामी आणि त्याच्या सहकाऱ्यांना कुवेतमध्ये अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. अदनानच्या टीमला भारतीय कुत्रे म्हणून हिणवल्याचा निंदास्पद प्रकार समोर आला आहे. अदनान सामी आणि त्याचे सहकारी एका कार्यक्रमासाठी कुवेतला गेले असताना, रविवारी रात्री हे सर्व जण विमानतळावर उतरले, त्यावेळी कुवेतमधील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना ‘इंडियन डॉग्ज’ म्हणजे भारतीय […]

कुवेतमध्ये भारताचा अपमान, अदनान सामीने ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केला संताप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अदनान सामी आणि त्याच्या सहकाऱ्यांना कुवेतमध्ये अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. अदनानच्या टीमला भारतीय कुत्रे म्हणून हिणवल्याचा निंदास्पद प्रकार समोर आला आहे. अदनान सामी आणि त्याचे सहकारी एका कार्यक्रमासाठी कुवेतला गेले असताना, रविवारी रात्री हे सर्व जण विमानतळावर उतरले, त्यावेळी कुवेतमधील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना ‘इंडियन डॉग्ज’ म्हणजे भारतीय कुत्रे म्हणून चिडवलं.

अदनान सामीने ट्विटरच्या माध्यमातून हा आरोप केला आहे. ‘आम्ही तुमच्या शहरात प्रेम घेऊन आलो होतो. आमच्या भारतीयांनी आम्हाला सन्मानाची वागणूक दिली, मात्र तुम्ही कोणताही पाठिंबा दिला नाहीत. कुवेत विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी विनाकारण माझ्या स्टाफला तुच्छ लेखलं आणि भारतीय कुत्रे म्हणून डिवचलं.

भारतीया दूतावासाशी संपर्क करुनही काही फायदा झाला नाही. कुवेतींची इतक्या उद्धटपणे वागण्याची हिंमतच कशी झाली?’ असा संताप अदनानने ट्वीटमधून व्यक्त केला आहे. अदनानसोबत घडलेला हा प्रकार फक्त अदनानसाठीचं नाही तर, भारतातील प्रत्येक नागरिकासाठी अपमानास्पद आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number