‘आदित्यची पत्रकार परिषद फुसकी ?’

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद शुक्रवारी, १३ जानेवारी रोजी शिवसेना भवन ( दादर ) येथे पार पडली. यावेळी, ‘रस्त्याचं काम समजून न घेता मुख्यमंत्र्यांनी टेंडर काढले’, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांवर आदित्य ठाकरेंनी केली आहे. […]

‘आदित्यची पत्रकार परिषद फुसकी ?’

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद शुक्रवारी, १३ जानेवारी रोजी शिवसेना भवन ( दादर ) येथे पार पडली. यावेळी, ‘रस्त्याचं काम समजून न घेता मुख्यमंत्र्यांनी टेंडर काढले’, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांवर आदित्य ठाकरेंनी केली आहे.

यावर ‘आदित्य ठाकरे यांचा कंत्राट, कंत्राटदारांशी संबंध आणि टक्केवारीचा उत्तम अभ्यास आहे असे दिसून येते, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. आधीच्या सरकारचा मुंबईतील कामाच्या दर्जाशी काहीही संबंध नव्हता ते फक्त टक्केवारीचं गणित मांडायचे, अशी टीकाही त्यांनी केली.

‘शिंदे – फडणवीस सरकारने मुंबईत उत्तम कंपन्या आणून वेळेत काम केल्यामुळे, समोरच्यांच्या पोटात दुखत आहे, फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा कायापालट होत आहे, यामुळे उद्धव ठाकरे भयभीत झाले आहेत आणि आदित्य ठाकरे भांबावले आहेत’, असे प्रवीण दरेकर यावेळी म्हटले.

उद्धव गटात विरोधी पक्ष म्हणून प्रश्न विचारायची धमक नाही आणि प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्याकडे मुद्देही नाहीत, अशी टीकाही दरेकरांनी उद्धव गटावर केली.

आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर ‘आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद एकूणच फुसका बार होती’, असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number