शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे नवीन दिशा देतील, आदित्य ठाकरेंचे सूचक वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   डोंबिवलीतील खासदार श्रीकांत शिंदेंनी मंगळवारी आयोजित केलेल्या रासरंग गरब्याच्या कार्यक्रमाला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावली.   त्यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे. शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळावा हा नवीन दिशा देणारा असतो. त्यामुळे ही परंपरा यंदाही कायम ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवीन दिशा देतील, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले. […]

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे नवीन दिशा देतील, आदित्य ठाकरेंचे सूचक वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

डोंबिवलीतील खासदार श्रीकांत शिंदेंनी मंगळवारी आयोजित केलेल्या रासरंग गरब्याच्या कार्यक्रमाला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावली.

 

त्यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे. शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळावा हा नवीन दिशा देणारा असतो. त्यामुळे ही परंपरा यंदाही कायम ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवीन दिशा देतील, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.

 

सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये तणावाचे सबंध पाहायला मिळत असून त्यातूनच शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चादेखील सुरु आहे. म्हणूनच, दसरा मेळाव्याला याबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number