शिंदेंच्या बंडावर आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड पुकारले. आणि या बंडामुळे उद्धव यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. तर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव गटाला मोठा धक्का बसला. दरम्यान, उद्धव गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. […]

शिंदेंच्या बंडावर आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड पुकारले. आणि या बंडामुळे उद्धव यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. तर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव गटाला मोठा धक्का बसला. दरम्यान, उद्धव गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा दावा केला. आदित्य यांना शिंदेंच्या बंडाबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावेळी आदित्य म्हणाले, तुरुंगाच्या भीतीने शिंदेंनी बंड पुकारले. तसेच भाजपासोबत गेलो नाहीतर तुरुंगात असेन, असे शिंदे म्हणाले होते. तसेच शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते, असेही आदित्य म्हणाले.

शिवसेना सोडून गेलेले आमदार हे स्वत:साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होण्याच्या भीतीने शिंदे आमच्या घरी येऊन रडले होते. तसेच भाजपासोबत गेलो नाही तर अटक करतील असेही शिंदे म्हणाले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number