आदित्य ठाकरेंचा ट्विटरवरुन मुंबई विद्यापीठाला टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबई विद्यापीठाची निकालाची 31 ऑगस्टचीही डेडलाईन आता हुकली आहे. अजूनही 33 निकाल जाहीर करणं बाकी आहे. सप्टेंबरचा महिना उजाडला तरी निकाल जाहीर झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे.   त्यामुळे ‘मुंबई विद्यापीठाने आता निकालबंदी जाहीर करावी’ असं वक्तव्य ट्विटरवरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ‘आंदोलन करून आता विद्यार्थी संघटनांना लाज […]

आदित्य ठाकरेंचा ट्विटरवरुन मुंबई विद्यापीठाला टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई विद्यापीठाची निकालाची 31 ऑगस्टचीही डेडलाईन आता हुकली आहे. अजूनही 33 निकाल जाहीर करणं बाकी आहे. सप्टेंबरचा महिना उजाडला तरी निकाल जाहीर झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे.

 

त्यामुळे ‘मुंबई विद्यापीठाने आता निकालबंदी जाहीर करावी’ असं वक्तव्य ट्विटरवरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ‘आंदोलन करून आता विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण विद्यापीठाला नाही. टेंडर काढून, पैसे देऊन, स्कॅनिंग वर खर्च करून, अत्याधुनिक कॉम्प्युटर्स वापरून निकाल काही ३ महिने लागू शकला नाही. हा घोटाळा आहे की नाही, याची चौकशी कधी होणार?’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने 6 सप्टेंबर ही नवी डेडलाईन जाहीर केली असून मंगळवारी पडलेला पाऊस आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचा अजब दावा मुंबई विद्यापीठाने केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number