शीतल म्हात्रे व्हिडिओप्रकरणी आदित्य समर्थक अडचणीत

आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ समाज माध्यामांवर प्रसारित करण्यात आला. याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर चार ते पाच मित्रांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांचे समर्थक साईनाथ दुर्गे यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई विमानतळावर दाखल होताच साईनाथ दुर्गे यांना […]

शीतल म्हात्रे व्हिडिओप्रकरणी आदित्य समर्थक अडचणीत

आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ समाज माध्यामांवर प्रसारित करण्यात आला. याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर चार ते पाच मित्रांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांचे समर्थक साईनाथ दुर्गे यांना अटक करण्यात आली आहे.

सोमवारी मुंबई विमानतळावर दाखल होताच साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शीतल म्हात्रे यांचा वादग्रस्त व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असून आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

काय म्हणाले आदित्य?

साईनाथ दुर्गे यांना अटक केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘साईनाथ हा वाघ आहे तो लढत राहील’, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांची मोठी धरपकड होत आहे. आम्हाला माहीत आहे की, आमच्यावर अन्याय होणार. मात्र, आम्ही लढत राहू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

व्हिडिओशी आमचा संबंध नाही – संजय राऊत

‘शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओशी आमचा कोणताही संबंध नसल्याची प्रतिक्रिया उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. तुमचं पाप लपवण्यासाठी मविआच्या कार्यकर्त्यांवर हात टाकत असाल तर हे कायद्याला धरून नाही. या व्हिडिओचा योग्य तपास करावा. तसेच व्हिडिओ खरा असल्यास सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शीतल म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असेही संजय राऊत म्हणाले.’

कोण आहेत साईनाथ दुर्गे?

  • साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत.
  • साईनाथ दुर्गे हे युवासेनेच्या कार्यकारिणीचे सदस्य होते.
  • मुंबई पालिकेच्या शिक्षण समितीमध्येही दुर्गे यांनी काम केले आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. आदित्य यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांना दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच चार ते पाच जणांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number