निवडणुक गुजरातची पण जुगलबंदी महाराष्ट्रात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   भाजप नेते आशिष शेलार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंमध्ये चांगलेच ट्वीटर युद्ध रंगले आहे. आदित्य ठाकरेंनी ट्वीटरवर तीन पोस्ट टाकल्या आहेत. याला आशिष शेलार यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले आहे. बरं हे असे राज्य ज्याचे मॉडेल दाखवून देश जिंकले! मॉडेल मुळात नाहीच, फक्त्त advertise मध्ये पॉलिटिकल मॉडेलिंग चालतं. “Nation First” राहिले […]

निवडणुक गुजरातची पण जुगलबंदी महाराष्ट्रात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजप नेते आशिष शेलार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंमध्ये चांगलेच ट्वीटर युद्ध रंगले आहे. आदित्य ठाकरेंनी ट्वीटरवर तीन पोस्ट टाकल्या आहेत. याला आशिष शेलार यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले आहे.

बरं हे असे राज्य ज्याचे मॉडेल दाखवून देश जिंकले! मॉडेल मुळात नाहीच, फक्त्त advertise मध्ये पॉलिटिकल मॉडेलिंग चालतं. “Nation First” राहिले नाही, खरा नारा ह्यांचा election first.

असं वाटतंय “One Nation, One Election” Policy मध्ये केंद्र आणि सर्व इतर राज्यांच्या एकत्र निवडणुका घेतील, गुजरात च्या वेगळ्या. ह्यांनी तर पार्लिमेंटचा ही मान राखला नाही, असं सर्वचं म्हणतायेत.

केंद्रीय मंत्रीमंडळ, सर्व मुख्यमंत्री, शेकडो MP आणि MLA, कित्येक इतर राज्यांचे पदाधिकारी, सर्वांनीच स्वतःला प्रचारात झोकून घेतले आहे, पण प्रश्न एवढाच आहे, देश चालवतोय तरी कोण?

असे तीन ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलेत. यावर आशिष शेलारांनी लगेच उत्तर दिले आहे.

आमच्या पक्षाच्या कार्यक्रमाची सुरूवात वंदे माँतरम..भारतमाता की जय..ने होते.त्यामुळे “नेशन” बद्दल सल्ले “युवरांजानी” आम्हाला देऊ नयेत!

आमच्या पक्षाची पंचायत ते पार्लमेंट माणसे निवडून आली.म्हणून दिसतात..जाऊ दे! तुम्ही गच्चीवरील हॉटेल..नाईटलाईफ वगैरे अशाआवडीच्या विषयावर बोला!

गुजरात निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्याचा फॉर्म्युल्याच्या जे शोधात आहेत.. त्यांनी एका राज्याच्या निवडणुकीवर कशाला बोलावे? असा ट्वीटरवार आशिष शेलारांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number