Pahalgam Attack : सैय्यद आदिल हुसैन शहाचं नवं घर, थेट हापतनार गावात पोहोचली ‘जय महाराष्ट्र’ ची टीम

पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्याला उद्या, 22 एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवाद्यांनी अचानक अंदाधुंद गोळीबार

Pahalgam Attack : सैय्यद आदिल हुसैन शहाचं नवं घर, थेट हापतनार गावात पोहोचली ‘जय महाराष्ट्र’ ची टीम

पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्याला उद्या, 22 एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या पर्यटनस्थळी दुपारच्या वेळी जेव्हा पर्यटक निसर्गाचा आनंद घेत होते, तेव्हा ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (TRF) च्या सशस्त्र दहशतवाद्यांनी अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्या भागात प्रवेश आणि बाहेर जाण्याचे मार्ग मर्यादित असल्याने अनेक पर्यटक तिथेच अडकले. या भीषण हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा बळी गेला, ज्यात बहुतांश पर्यटकांचा समावेश होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.

हल्ल्याच्या वेळी स्थानिक काश्मिरी रहिवासी, घोडेवाले आणि गाईड्स यांनी दाखवलेले धाडस आजही विसरता येणार नाही. गोळीबार सुरू असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी पर्यटकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यास मदत केली. काहींनी तर पर्यटकांचे प्राण वाचवताना स्वतःचे बलिदान दिले. या संकटकाळात स्थानिक आणि लष्कर यांनी मिळून केलेल्या बचावकार्यामुळे मृतांचा आकडा अधिक वाढण्यापासून रोखता आला. हे शौर्य आजही स्थानिक लोकांच्या माणुसकीची साक्ष देते.  

या पहलगाम हल्ल्यातील एकमेव मुस्लिम बळी सय्यद आदिल हुसेन शाह यांचे कुटुंब सुमारे 40 वर्षे जुन्या, मोडकळीस आलेल्या मातीच्या आणि लाकडाच्या घरात राहत होते. आता हे कुटुंब एका नवीन, एकमजली, काँक्रीटच्या घरात राहायला जाण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने अंदाजे 10-12 लाख रुपये खर्च करून हे नवीन घर बांधले आहे. हल्ल्याच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे त्यांना भेट देतील आणि त्यानंतर ते नवीन घरात राहायला जातील, अशी आशा या कुटुंबाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number