आधार नोंदणी आता सरकारी कार्यालयात होणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आधार कार्डची नोंदणी आता सरकारी कार्यालयातच होणार आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत आधार नोंदणी सरकारी किंवा नगरपालिकांच्या परिसरात स्थलांतरीत करण्यासाठी सांगण्यात आलं. आधार क्रमांक देणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुषण पांडे यांनी हे आदेश दिले. तसंच पत्रच त्यांनी लिहिलं.   आधारसाठी नोंदणी आणि अद्ययावत करण्याच्या कामासाठी सरकारी कार्यालयांच्या […]

आधार नोंदणी आता सरकारी कार्यालयात होणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आधार कार्डची नोंदणी आता सरकारी कार्यालयातच होणार आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत आधार नोंदणी सरकारी किंवा नगरपालिकांच्या परिसरात स्थलांतरीत करण्यासाठी सांगण्यात आलं. आधार क्रमांक देणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुषण पांडे यांनी हे आदेश दिले. तसंच पत्रच त्यांनी लिहिलं.

 

आधारसाठी नोंदणी आणि अद्ययावत करण्याच्या कामासाठी सरकारी कार्यालयांच्या परिसरात केंद्र शोधा असे आदेश देण्यात आले. ही कामं येत्या 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करायची आहेत. आधार नोंदणीसाठीची ही नवी केंद्रे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालये किंवा नगरपालिकांच्या कार्यालयात असतील, असं पांडे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number