जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सर्वोच्च न्यायालयाने बँक खाते व मोबाइल क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. पुढील निर्णय येईपर्यंत ही मुदतवाढ असेल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
येत्या ३१ मार्चपर्यंत बँक खाते आणि मोबाइल क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्याची अखेरची मुदत होती. सर्वोच्च न्यायालयात आज याप्रकरणी सुनावणी होती. त्यावर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं ही मुदतवाढ दिली आहे.
सरकार याप्रकरणी कोणावरही बळजबरी करू शकत नाही असं मत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी नोंदवलय आहे.