सध्या कडाक्याच्या उकाड्याने प्रत्येक जण हवालदिल झाला आहे. त्यामुळे सध्या विजेचा वापरदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे. मुंबईसारख्या महानगरात तीस सेकंदांसाठी जरी वीज गेली तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे आता कानाकोपऱ्यात वीजेचा पुरवठा व्हावा यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. अशातच आता अदानी पॉवर आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात वीजपुरवठ्याचा एक महत्त्वाचा करार झाला आहे. या करारामुळे राज्याला दीर्घकालीन स्वरुपाचा फायदा होणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अदानी पॉवर महाराष्ट्रात 2 हजार 500 मेगावॅट वीजपुरवणार आहे.ऊर्जा वीजपुरवठ्यासाठी ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ प्राप्त झाल्याची माहिती अदानी पॉवरची भांडवली बाजाराला दिली आहे. करारानुसार अदाणी पॉवर पुढील 25 वर्षांच्या कालावधीत राज्यात वीजपुरवठा करणार आहे.
राज्यातील डेटा सेंटरसाठी अविरत अक्षय ऊर्जा पुरवठा करण्यासंदर्भात फायदा होणार असल्याची माहितीही मिळाली आहे. कंपनीने ई-लिलाव प्रक्रियेत यशस्वी बोलीदार म्हणून स्थान मिळवले असून, हा करार दीर्घकालीन स्वरूपाचा असणार आहे. या प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रातील वीजपुरवठा अधिक स्थिर आणि हरित ऊर्जेकडे वळण्यास मदत होणार आहे. राज्यातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता करण्यासाठी हा करार महत्त्वाचा ठरणार आहे.
हेही वाचा – Mumbai Gas Shortage: आखाती युद्धाचा गॅस पुरवठ्यावर परिणाम; मुंबईत वाढली चुलींची मागणी
या करारामुळे पुढच्या 25 वर्षात उर्जेचा पुरवठा वाढणार आहे. आता या कराराची अंमलबजाणी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे.अदानी उद्योग समूह हा देशातील आघाडीच्या उद्योग समूहांपैकी एक आहे. हा उद्योग समूह वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो.