मुंबई, २३ जून २०२३, प्रतिनिधी : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘गुम है किसी के प्यार में’ मधील अभिनेत्री तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया हे आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्री तन्वी ठक्कर हिने मुलाला जन्म दिला आहे. याबाबत या जोडप्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली.
अभिनेत्री तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया या जोडप्याने गुरुवारी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्याला पुत्ररत्न झाले असल्याची माहिती दिली. या फोटोमध्ये तन्वी आणि आदित्य पाळण्यातील मुलाकडे पाहताना दिसत आहेत. परंतु या पाळण्यातील मुलाचा चेहरा अद्याप दाखवलेला नाही. या फोटोला त्यांनी “19.06.2023, येथून सर्वकाही सुरू झाले” असे कॅप्शन दिले आहे. ही आनंदाची बातमी ऐकताच अनेक टीव्ही कलाकारांनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.
अभिनेत्री तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया हे दोघे ‘एक दुसरे से करते हैं प्यार हम’ च्या सेटवर भेटले होते. त्यानंतर 2021 मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नाच्या 2 वर्षानंतर ते आता पालक झाले आहेत.