पुणे : मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या पिंपरी चिंचवडमधील घरी एका अज्ञात इसमाने जबरदस्ती घरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. या इसमाने मी सोनालीचा चाहता असून, मला तुमच्या घरात राहू द्या, असं म्हणत घरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी यांनी त्या अज्ञात व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र झटापटीत त्यांना किरकोळ जखमी झाली आहेत. त्यानंतर त्यांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली होती. आता या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर सोनालीचे कुटुंब घाबरलं आहे. ही घटना निगडी येथील घरात घडली आहे. अलिकडेच सोनाली ही विवाहबद्ध झाली आहे आणि ती तिच्या पतीसोबत सध्या दुबईमध्ये आहे. तिच्या गैरहजेरीत अज्ञात इसमाने घरी येऊन हा सगळा गोंधळ घातल्यामुळे सोनालीसुद्धा चिंतेत आहे.