Actor Sonali Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ट्रॅफिकमध्ये अडकली, 5 तास एकाच जागी; पोलिसांना आवाहन करताना मात्र इंग्रजी आणि हिंदी भाषेचा वापर

मुंबई : मराठी, हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकतीच इंस्टाग्राम पोस्टवर व्हिडीओ शेअर करत शहरातील गंभीर संमस्येवर भाष्य केलं आहे. मुंबई – पुणेसारख्या शहरात वाहतुकीची गंभीर समस्या असून याचा फटका अभिनेत्री सोनाली कुलकर्णीलाही बसला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या अभिनेत्रीला तब्बल ५ तास वाहतुककोंडीत अडकून रहावे लागले. याबाबत सोनालीने […]

Actor Sonali Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ट्रॅफिकमध्ये अडकली, 5 तास एकाच जागी; पोलिसांना आवाहन करताना मात्र इंग्रजी आणि हिंदी भाषेचा वापर

मुंबई : मराठी, हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकतीच इंस्टाग्राम पोस्टवर व्हिडीओ शेअर करत शहरातील गंभीर संमस्येवर भाष्य केलं आहे. मुंबई – पुणेसारख्या शहरात वाहतुकीची गंभीर समस्या असून याचा फटका अभिनेत्री सोनाली कुलकर्णीलाही बसला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या अभिनेत्रीला तब्बल ५ तास वाहतुककोंडीत अडकून रहावे लागले. याबाबत सोनालीने व्हिडीओमार्फत नाराजी व्यक्त केली आहे.  

हेही वाचा : Raghav Chadha BJP Entry : राघव चड्ढांच्या भाजप प्रवेशामागे प्रियांका चोप्रा? ‘या’साठी केली मध्यस्थी; नवजोत कौर सिद्धूंचा खळबळजनक दावा

नेमकं काय घडलं ?

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली. दरम्यान, मानखुर्द येथे ब्रीजवर त्यांची गाडी वाहतुककोंडीमुळे पाच तास अडकून पडली. यावेळी सोनालीने मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत तेथील परिस्थितीची माहिती दिली. मात्र व्हिडीओत बोलताना सोनालीने प्रामुख्याने इंग्रजी आणि हिंदीचा वापर करत वाहतूक पोलीस आणि मुंबई पोलीसांना आवाहन केले. महाराष्ट्र पोलीस विभागात बहुतांश पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचारी हे मराठी आहेत. त्यातही मुंबई – पुणेसारख्या शहरात तर मराठी भाषिक पोलीस कर्तव्यावर आहेत. तरीही सोनाली कुलकर्णी यांनी मराठीत बोलणे टाळून या समस्येकडे लक्ष द्या, असे आवाहन इंग्रजी आणि हिंदी भाषेत केले आहे. 

सध्या राज्यातील रिक्षा – टॅक्सीचालकांच्या मराठी भाषा सक्तीवरून रणरंकद माजले आहे. त्यातच मराठी सक्ती केवळ कष्टकरी वर्गालाच का, सेलिब्रिटी – उद्योजकांना ही सक्ती का लागू केली जात नाही, असा सवाल एमआयएमचे ने ते वारिस पठाण यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे अमराठी भाषिक सोडा तर मराठमोळी अभिनेत्रीदेखील मुंबई पोलिसांशी मराठीत संवाद साधत नाही, हेच यातून दिसून येते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number