मराठी सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे सह इतर काही कलाकारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. नाशिक मध्ये होत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारणी बैठकीत हा प्रवेश पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करण्यात आला. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आपल्या अभिनय कौशल्याने महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात वेगळी ओळख मिळवली आहे. दरम्यान त्यांनी त्यांच्या राजकारणाच्या इनिंगला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पासून सुरुवात केली होती. त्यांनी २०२० मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी बेर्डे यांना देण्यात आली होती.
प्रिया बेर्डे यांच्यासह गिरीश परदेशी, दिग्दर्शक मधुरा जोशी, विद्या पोकळे, मनिषा मुंडे, वेदांत महाजन, दत्तात्रय जाधव यांच्यासह आणखी काही दिग्गज कलाकारांनी आज भाजप पक्षात प्रवेश झाला.महिला कलाकार, लोक कलावंत, तंत्रज्ञ यांच्यासाठी काम करण्याचा मानस असल्याचं प्रिया बेर्डे यावेळी म्हणाल्या होत्या. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादीची निवड केल्याचं त्या म्हणाल्या होत्या. पण अवघ्या दोन वर्षात त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपात प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.