Lakshmichya Pavalani Star Pravah Serial : कला-अद्वैतच्या आयुष्यात अनेक रहस्य घेऊन आली ती…, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत नवा अध्याय सुरु

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' लोकप्रिय मालिकेत लवकरच एक नवा आणि सस्पेन्सीव वळण सुरु होणार आहे. स्टार प्रवाहवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.

Lakshmichya Pavalani Star Pravah Serial : कला-अद्वैतच्या आयुष्यात अनेक रहस्य घेऊन आली ती…, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत नवा अध्याय सुरु

स्टार प्रवाह सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असल्याच पाहायला मिळत आहे. तसेच या वाहिनीवरील प्रत्येक मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद पडताना देखील पाहायला मिळते. अशातच स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे आणि आता देखील ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत इशा केसकर, अक्षर कोठारी, किशोरी आंबीये, दिपाली पानसरे, अपूर्वा सपकाळ, रोहिणी नाईक, ध्रुव दातार आणि ऋत्विक तळवलकर यांच्या भूमिका आहेत.

या मालिकेत सध्या कला-अद्वैतच्या आयुष्यात सगळ काही सुरळीत सुरु असून त्यांच्या पुन:लग्नाची धामदुम मालिकेत पाहायला मिळत आहे. या लोकप्रिय मालिकेत लवकरच एक नवा आणि सस्पेन्सीव वळण सुरु होणार आहे. स्टार प्रवाहवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. व्यवसायाने नर्स आणि अनेक रहस्य मनात ठेवून शांत आयुष्य जगणाऱ्या सुकन्या पाटील या नव्या पात्रासह मालिकेचा नवा अध्याय सुरु होणार आहे. या पात्रासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर हिची निवड झाली आहे. यामध्ये तिच व्यक्तीमत्त्व पाहायला गेल तर, ती रुग्णांची सेवा करणारी सेवीका आणि पेशाने डॉक्टर आहे. या निमित्ताने लोकांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचं निमित्त होता येतं याचा तिला आनंद आहे. अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर ही तब्बल चार वर्षांनंतर ती मालिका विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे.

यावेळी नक्षत्रा म्हणाली की, "माझ्या करिअरची सुरुवातच मालिकेने झाली होती. त्यामुळे टीव्ह हे माध्यम माझ्यासाठी लाडकं झाल आहे. प्रेक्षकांच्या जगात पुन्हा यायला मिळतंय याचा आनंद आहे. सुकन्या पाटील हे पात्र मी साकारणार आहे. सुकन्या या पात्राविषयी ऐकताक्षणीच ते मला भावलं. सुकन्या आणि माझा स्वभाव बराच मिळताजुळता आहे. सुकन्या अत्यंत सकारात्मक आहे. तिचा देवावर प्रचंड विश्वास आहे. सुकन्या प्रमाणेच मी देखिल माझ्या आयुष्यात जे काही चांगलं-वाईट घडतं ते देवावर सोडते.छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणाऱ्या आणि नेहमी हसमुख असणाऱ्या सुकन्याच्या मनात मात्र प्रचंड वेदना आहेत. मला मिळालेलं आयुष्य भेट आहे, हक्क नाही असं तिचं मत आहे. ती स्वतःच्या भूतकाळाला कधीच कोणासमोर उघड करत नाही. तिच्या मते मी कोण आहे यापेक्षा, मी आज काय करते हे महत्त्वाचं आहे. सुकन्याचा भूतकाळ नेमका काय आहे? मालिकेची गोष्ट पुढे जाताना सुकन्याच्या येण्याने नेमकं काय घडणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. " मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number