मुंबई, १७ जून २०२३, प्रतिनिधी : मराठी कलाकार हे कायमच समाज माध्यमांवर चर्चेत असतात. बरेच मराठी कलाकार समाज माध्यमांवर आपली मते निर्भीडपणे मांडत असतात.यामुळे बऱ्याच वेळा त्यांना टीकेला सामोरे जावे लागते.अशातच आता अभिनेता संतोष जुवेकर याची एक पोस्ट सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.
अभिनेता संतोष जुवेकर याने अलीकडेच सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर यासह उज्जैन येथील महाकाल आणि काल भैरवनाथचे दर्शन घेतले. यावेळी आपली एक पोस्ट त्याने समाज ,माध्यमांवर सामायिक केली. ज्यात त्यांनी केलेल्या दर्शनाचे फोटो आणि व्हिडीओ दिसत आहेत. या फोटोवर चाहत्यांनी काही चांगल्या कंमेंट्स केल्यात तर काहींनी मात्र त्याला ट्रोल केले आहे.
खरतर संतोषने फोटोखाली लिहिलेल्या कॅप्शनमुले तो चर्चेत आलाय. आपल्या उज्जैन दौऱ्याचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर संतोषने त्याखाली लिहिले की, ”आमच्या महेश दादामुळे सध्या अनेक देवस्थानांच्या दर्शनांच पुण्य मला मिळतय. काल पहिल्यांदा उज्जैन येथे महाकाल आणि काल भैरवनाथचे दर्शन घेतलं. अगदी अभिषेक सुद्धा करायला मिळाला आणि एक वेगळीच ऊर्जा जाणवली त्याच्या गाभाऱ्यात तशीच ऊर्जा मला अनेक मंदिरात जाणवली आहे मी चर्च मधे सुद्दा जातो गोव्यात गेलो की काही जुनी चर्च आहेत मला आवडत जायला. मी दरग्यातही जातो नाशिकहून ठाण्याकडे येताना घाट संपला की डाव्या बाजूला एक दर्गा आहे मी नचूकता आणि नचूकवता त्या दरग्यात जातोच जातो त्या चर्च आणि दरग्यातही मला तीच ऊर्जा जाणवते आणि ती सकारात्मक ऊर्जा कायम आपल्या सोबत रहावी ही प्रार्थना मी करतो कायम. पण मला आज त्या मंदिरातल्या देवाला त्या चर्च मधल्या येशूला आणि त्या दरग्यातल्या अल्ल्हाला सांगायचंय तुझ्या गाभाऱ्यात ही जी सकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्ण विश्वात भरुदे. हा सुद्धा तुझाच तर गाभारा आहेना.”
त्याचे हे कॅप्शन पाहून काहींनी त्याला ट्रॉल केलाय एकाने कंमेंट केली आहे की, “: ”मंदिरात जाऊन आले आणि पोस्ट टाकली की खाली description मध्ये दर्गा आणी चर्चच पण महत्व लिहावं लागत बाबा कारण मग चुकून जर बाकीच्या धर्माचे फॅन्स नाराज झाले तर वरून हे पण लिहायचं मी काय अंधश्रधळू नाहीये म्हणजे स्वतःला पुरोगामी पण सिद्ध करून झालं. मंदिरात गेलात ना फक्त्त तेवढंच लिहा ना नंतर चर्च मध्ये जाऊन त्याबद्दल लिहा. किती ही लाचारी आणी hyopocrisy.” असे असताना काही नेटकऱ्यांनी त्याचे कौतुकही केले आहे.