जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या ‘कुंकू’ मालिकेत जानकीच्या भावाची गण्याची भूमिका साकारणारा अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन झालं. सोमवारी पहाटे मालाड रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मृतदेह सापडला. बालकलाकार म्हणून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणारा प्रफुल्ल कुंकू मालिकेमुळे घरघरात पोहोचला होता.
अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘बारायण’ सिनेमातही त्याने भूमिका साकारली होती. मालाडजवळ रेल्वे अपघातात प्रफुल्लचे निधन झाले. कलर्स मनोरंजन वाहिनीवरील तू माझा सांगती, नकुशी, आवाज-ज्योतिबा फुले या मालिकांमध्येही त्याच्या भूमिका गाजल्या व त्या लोक प्रिय ही झाल्या.
प्रफुल्लला खरी प्रसिद्धी ही ‘कुंकू’ मालिकेमुळंच मिळाली होती. प्रफुल्लच्या अशा अकाली मृत्यूनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.