अभिनेता किरणने घातली मदतीची साद

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता किरण माने हा अनेकदा कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत दिसत असतो. नुकताच संपन्न झालेली स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतील अंतर्गत वादामुळे किरणला मालिकेतून काढण्यात आले. त्यामुळे किरणबाबत चुकीची भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली. दरम्यान, किरणने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. किरणने बहिष्कृत कुटुंबातील एका व्यक्तीला […]

अभिनेता किरणने घातली मदतीची साद

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता किरण माने हा अनेकदा कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत दिसत असतो. नुकताच संपन्न झालेली स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतील अंतर्गत वादामुळे किरणला मालिकेतून काढण्यात आले. त्यामुळे किरणबाबत चुकीची भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली. दरम्यान, किरणने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. किरणने बहिष्कृत कुटुंबातील एका व्यक्तीला हृदयविकाराच्या आजाराच्या उपाचारासाठी मदतीची साद घातली आहे.
किरण यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले की, ‘मी माझ्या बायकोची कौमार्य तपासणी करणार नाही. असली अनिष्ट परंपरा मी नाकारतो. असं ठामपणे सांगत विवेक तमाईचीकरने स्वतःच्या समाजाशी संघर्षाला सुरुवात केली. विवेक हा समाज कार्यासाठी काम करतो. समाजानं वाळीत टाकलं, तरी स्त्रीत्वाचा व होणाऱ्या बायकोचा सन्मान त्याने राखला. परंतु स्वतःच्या घरातनं बदलाला सुरुवात करणारा विवेकसारखा जिगरबाज लाखात एक असतो, असं किरणने म्हटलं आहे.
तसेच त्यांनी पुढे लिहिले की, विवेकचा तरुण भाऊ अक्षय हृदय विकाराच्या आजारामुळे रुग्णालयात उपचार घेत आहे. अक्षयला कोरोना काळात तीनवेळा हृदय विकाराचा झटका येऊन गेला आणि आता त्याचं हृदय १५% कार्यरत असल्यामुळे डॉक्टरांनी हॉर्ट ट्रान्सप्लांट हा उपचारात्मक उपाय सुचवला आहे. अक्षयसुद्धा समाज कार्यासाठी कार्यरत असतो. हार्ट ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेचा खर्च २१ लाख असून त्याच्या पुढच्या शत्रक्रियेचा खर्च खूप मोठा आहे. या शस्त्र क्रियेनंतर अक्षय पूर्वीसारखे जीवन जगू शकेल. मात्र, या रक्कम मोठी असल्यामुळे अक्षयच्या कुटुंबियांना मदतीची अत्यंत गरज आहे, असे अक्षयने पोस्टमध्ये लिहिले आहे.
तसेच, पोस्टमध्ये अक्षयच्या उपचारासाठीची माहिती तसेच अक्षयचा रुग्णालयातील फोटो सामायिक केला आहे. तसेच, आतापर्यंत चाहत्यांनी ६ लाख २९ हजार रुपयांची मदत केली असून मुख्यमंत्री निधीतून २ लाख रुपयांच्या मदतीचे आश्वासन देण्यात आलं असल्याचं किरण यांनी पोस्टमधून सांगितलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number