जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
जेष्ठ अभिनेते गिरिश ओक पोलिसांच्या मदतीला धावून आलेत. गिरीष ओक यांनी हॉर्न नॉट ओके प्लिझ या अभियानाच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषणाविषयी जनजागृती करणार आहेत. वाढत्या वाहनांमुळे वातावरणात प्रचंड ध्वनि प्रदूषण वाढत चालले आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होत चालले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता संतोष जुवेकर आणि पोलिसांनी एक अनोखी मोहिम सुरु केली होती. ठाण्यात ट्राफिकच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांसमोर ढोल ताशे बडवून त्यांना ट्राफिकचे नियम पाळण्याचे अवाहन केले होतं. याच पार्श्वभूमीवर अभिनेते गिरिश ओक ध्वनि प्रदूषणाविषयी जनजागृती करण्याच्या प्रयत्नात आहेत.