अभिनेता अल्लू अर्जूनला झाली अटक

दक्षिणात्या अभिनेता अल्लू अर्जून याला हैद्राबादमधून अटक करण्यात आली आहे

अभिनेता अल्लू अर्जूनला झाली अटक

मुंबई : दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून याला हैद्राबादमधून अटक करण्यात आली आहे. पुष्पा – 2 चित्रपटाच्या प्रीमियरवेळी हैद्राबादमधील थिएटरमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. यामुळे हैद्राबाद पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

 

हैद्राबाद येथे आरटीसी चौकात संध्या थिएटरमध्ये पुष्पा – 2 चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. स्क्रिनिंसाठी अल्लू अर्जून आणि संपूर्ण चित्रपटांची टीम येणार असल्याने चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्या ठिकाणी मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीच्या घटनेत रेवती नावाच्या महिलेचा मृत्यृ झाला. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणात अल्लू अर्जून याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता त्याला अटक करण्यात आली आहे.

 

पुष्पा – 2 सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान थिएटरमध्ये काय घडले ?

पुष्पा – 2 या चित्रपटाचे स्क्रिनिंग हैद्राबादमधील संध्या थिएटरमध्ये होते. या प्रीमियरला अल्लू अर्जून स्वत: उपस्थित राहणार असल्याने प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. अल्लू अर्जूनचा मोठा चाहतावर्ग असल्याकारणाने गर्दीमुळे लोकांमध्ये धक्काबुक्की झाली. अनेक लोक एकमेकांवर पडले. त्यामध्ये काही लोक जखमी झाले. या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये अल्लू अर्जूनचे चाहते बेशुद्ध अवस्थेत पाहायला मिळाले. त्यावेळी घटनास्थळी तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा आणि पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त करावा लागला. तसेच पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज लाठीचार्ज करण्यात आला. या गर्दीमुळे थिएटरचा गेटदेखील ढासळला होता.   

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number