पंतप्रधानांना भेटाण्यासाठी शिर्डीत जाणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना पोलिसांकडून पुण्यातच रोखण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीत येणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई शबरीमाला महिला प्रवेशप्रकरणी पंतप्रधानांना भेटायला शिर्डीत जाणार होत्या.
महिलांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही मंदिर प्रवेशासाठी झगडावं लागत आहे, याचा जाब विचारण्यासाठी आज भुमाता ब्रिगेडचे शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी निघाले होते.
भूमाता ब्रिगेडच्या वतीने जिल्हा अधिक्षक पोलीस अहमदनगर यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवण्यात आले होते, त्यांनी जर पंतप्रधानांची भेट घालून दिली नाही तर पंतप्रधानांच्या गाडीचा ताफा अडवून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करू असा इशारा दिल्यानंतर तृप्ती देसाई यांना आज घराबाहेर पडण्यास मनाई केली, तसेच तृप्ती देसाईंना सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.