अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील दुर्घटना मनाला व्यथित करणारी – देवेंद्र फडणवीस

  अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागल्यामुळे संपूर्ण अतिदक्षता विभाग भस्मसात झाले आहे. या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू झाल्याची तसेच काही रुग्ण जळल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वजण ५० ते ८५ या वयोगटातील […]

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील दुर्घटना मनाला व्यथित करणारी – देवेंद्र फडणवीस

  अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागल्यामुळे संपूर्ण अतिदक्षता विभाग भस्मसात झाले आहे. या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू झाल्याची तसेच काही रुग्ण जळल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वजण ५० ते ८५ या वयोगटातील होते.

  या दुर्घटनेबाबत देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी ट्विट केले की, ‘ अहमदनगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो.’

  अहमदनगर जिल्हा रूग्णालयात लागलेल्या आगीत १० बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या आगीत भाजलेल्या रुग्णांना तातडीने दुसऱ्या कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यातील काही रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number