नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

चायना मांजामुळे पशु पक्षांसह माणसांनाही दुखापत झाल्याच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या आहेत.

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

अकोला : चायना मांजामुळे पशु पक्षांसह माणसांनाही दुखापत झाल्याच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या आहेत. या आधारावर जिल्हा प्रशासनाने चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. घातक असलेला चायना मांजाची विक्री करणाऱ्यांवर अकोला पोलिसांनी कारवाई केली. अकोल्यातल्या रामदास पेठ पोलिसांनी दोन विक्रेत्यांसह मोठ्या प्रमाणात चायना मांजा जप्त केला आहे.

हेही वाचा : भुजबळांच्या वर्चस्वाला राष्ट्रवादीचेच आव्हान

अकोल्यातील तेलीपुरा चौकातील गोल्डन पतंग सेंटरमध्ये हा चायना मांजा जप्त करण्यात आला. मुकिम अहमद आणि संतोष ठाकूर यांच्यावर चायना मांजा विक्री केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चायना मांजाचा वापर टाळावा आणि विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक पोलिसांना त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे. 

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number